आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020

आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द

आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द

अहमदनगर - "पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मंत्रीपद स्विकारल्यापासून चांगले काम करीत आहेत, त्याचबरोबर एक सक्षम नेतृत्व" असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. "मुंबई पोलिस हे चांगले काम करतात, त्यांची तुलना स्कॉटलँडमधील पोलिसांसोबत केली जाते. विशेष म्हणजे तेच मुंबई पोलिस अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास करीत आहेत" हेही वर्षा गायकवाड यांनी आवर्जुन सांगितले.

"आदित्य ठाकरेची पद्य पुरस्काराच्या शिफारस समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड योग्य आहे. कारण आदित्यमध्ये काम करण्याची मोठी जिद्द आहे. त्याचबरोबर अनुभव सुध्दा चांगला आहे, युवा व्यक्ती चांगलं काम करीत असेल हरकत काय आहे" असेही त्यांनी सांगितले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. पण अनेकांची इच्छा आहे की हा तपास सीबीआय मार्फेत केला जावा. त्यावर वर्षा गायकवाड यांना विचारले असता, त्या म्हणाल्या मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलॅंड पोलिसांसोबत होते. ते पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या अहमदनगर दौ-यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांना आदित्य ठाकरे आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणा विषयी प्रश्न विचारण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News