पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

इत्यादी सदस्यांचा समावेश

उद्योगमंत्री सुभाष देसाई
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे
राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची नियुक्ती

वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तीला केंद्र सरकारकडून दरवर्षी पुरस्कार दिला जातो. त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला मान्यवरांची नावे शिफारस करण्यासाठी एक समिती तयार केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर 5 कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांच्याही समितीत समावेश करण्यात आला आहे.

इत्यादी सदस्यांचा समावेश

उद्योगमंत्री सुभाष देसाई
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे
राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

पद्य पुरस्कार हा भारताकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक मानला जातो. विशेष म्हणजे २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला पुरस्कार जाहीर केले जातात. देण्यात येणा-या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तयार केलेली समिती मान्यवरांच्या शिफारसी केंद्र सरकारला करत असते. केलेल्या शिफारशीला पुरस्कार मिळेल याची खात्री नसते. काहीवेळेला केंद्र सरकार खासदारांच्या किंवा आपल्या सुत्रांकडून पुरस्कारासाठी मान्यवरांची निवड करते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News