अदिती तटकरेंना पालकमंत्री केल्याने जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 11 January 2020
  • सुनील तटकरे यांच्या कन्या असलेल्या अदिती तटकरे ह्या स्थानिक शिवसेना नेत्यांना चांगल्याच जड जाणार अशी चर्चा आहे.
  • माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा जिल्हाभर पसरू लागली आहे. 

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून  पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या अदिती सुनील तटकरे ह्यांच्यासारख्या नवख्या आमदाराला रायगड सारख्या महत्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने रायगडचे शिवसेना नेते बरेच अस्वस्थ आहेत.

सुनील तटकरे यांच्या कन्या असलेल्या अदिती तटकरे ह्या स्थानिक शिवसेना नेत्यांना चांगल्याच जड जाणार अशी चर्चा आहे. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा जिल्हाभर पसरू लागली आहे.

तसेच महाड चे आमदार भरत गोगावले हेदेखील बरेच अस्वस्थ असून या निर्णयाविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

अदिती सुनील तटकरे यांच्या विरोधात लढलेले शिवसेनेचे उपनेते डॉ विनोद घोसाळकर  हेसुद्धा चांगलेच नाराज आहेत. विनोद घोसाळकर हे जुने निष्ठावंत शिवसैनिक ओळखले जातात.

मुंबईच्या दहिसर मध्ये एकेकाळी  स्वतःची राजकीय कारकीर्द गाजवलेले  डॉ विनोद घोसाळकर हे पक्षाच्या आदेशामुळे आपल्या मूळ गावी जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रीवर्धनमधून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला तो त्यांनी अगदी खुल्या मनाने स्वीकारला देखील. मात्र राज्याच्या सत्तासमीकरणाचा संपूर्ण सारीपाटच बदलल्याने  विनोद घोसाळकर हे चांगलेच तोंडावर आपटल्याची चर्चा आहे.

त्यामुळे विनोद घोसाळकर यांच्यासह अनंत गीते,अनंत तरे,भरत गोगावले यांच्यासह सेनेचे स्थानिक नेते चांगलेच दुखावले आहेत त्यामुळे तीन पक्षांचे एकत्रित सरकार चालवणाया उद्धव ठाकरे यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News