आदित्य-दिशा पुन्हा 'या' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार एकत्र 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020
  • या चित्रपटाचा सिक्वेल निर्माती एकता कपूर आणि भूषण कुमार एकत्रितरित्या करणार आहेत. यामध्ये अभिनेत्री दिशा पटनी मुख्य भूमिकेत असणार आहे.

सध्या आपल्या 'मलंग' चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या दिशा पटनी लवकरच एका हिंदी चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. २०१४ साली दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

या चित्रपटाचा सिक्वेल निर्माती एकता कपूर आणि भूषण कुमार एकत्रितरित्या करणार आहेत. यामध्ये अभिनेत्री दिशा पटनी मुख्य भूमिकेत असणार आहे. याबाबत तिने आपल्या इंस्टाग्रामवरून एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. 

२०१४ मध्ये आलेल्या 'एक व्हिलन' मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आदित्य रॉय कपूर, दिशा पटनी आणि जॉन अब्राहम हे मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नुकताच आदित्य आणि दिशाचा "मलंग" हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदित्य आणि दिशाची
ही जोडी पुन्हा एकत्रितरित्या पाहायला मिळणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News