आदिल-सादिया रोमॅंटिक अंदाजात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020

चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रेक्षकांकडून फारच कौतुक करण्यात आले होते. यानंतर नुकतेच या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये आदिल-सादिया रोमॅंटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. १९९० सालच्या कश्‍मिरी पंडितांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘शिकारा’ या चित्रपटातून अभिनेता आदिल खान आणि अभिनेत्री सादिया हे दोघेही बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. हे दोघेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता.

चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रेक्षकांकडून फारच कौतुक करण्यात आले होते. यानंतर नुकतेच या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये आदिल-सादिया रोमॅंटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. १९९० सालच्या कश्‍मिरी पंडितांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

कश्‍मिरी पंडितांना जम्मू-कश्‍मीरमधील त्यांचे घर सोडावे लागले होते यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विधु विनोद चोप्रा यांचे असून फॉक्‍स स्टुडिओजद्वारे चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News