नीतूला अभिनयाव्यतिरिक्त समाजकार्यामध्येही रस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 September 2019
  • या वेळी या कार्यक्रमात नीतू चंद्राने हजेरी लावली
  • कॅन्सर पीडितांना अधिक बळ मिळण्यासाठी नीतूने मार्गदर्शनही केले​

‘गरम मसाला’, ‘नो प्रॉब्लेम’ यासारख्या चित्रपटातून अभिनेत्री नीतू चंद्रा प्रेक्षकांसमोर आली. ‘इश्‍का इश्‍का’ या गाण्यामुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. नीतूला अभिनयाव्यतिरिक्त समाजकार्यामध्येही विशेष रस आहे. नीतू सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर असली, तरी तिचे सामाजिक कार्य सुरूच आहे.

संजुक्ता अरुण यांनी कॅन्सरमुळे त्रस्त असलेल्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम खास ‘कॅन्सर पेशंट ॲण्ड असोसिएशन’च्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या वेळी या कार्यक्रमात नीतू चंद्राने हजेरी लावली. कॅन्सर पीडितांना अधिक बळ मिळण्यासाठी नीतूने मार्गदर्शनही केले. या वेळी कॅन्सरग्रस्त मुलांमध्ये नीतू रमून गेली होती.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News