‘आदर्श’चा 'एकदम कडक' शो लवकरच

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 29 January 2019

शिंदे घराण्याची आणि लोकसंगीताची परंपरा जपणारा आदर्श शिंदे महाराष्ट्रातील लोककलेची परंपरा जपणाऱ्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर नुकताच सुरू झालेला ‘एकदम कडक’ हा शो महाराष्ट्रातील लोककलांना मंच उपलब्ध करून देणार आहे आणि अशा शोसाठी आदर्श शिंदे सूत्रसंचालन करणार आहे.

याविषयी तो म्हणतो, ‘मी महाराष्ट्राच्या मातीतला गायक आहे. आमचे घराणे सोडले तर अनेक लोककलावंतांना कधी संधीच मिळाली नाही. अशा दुर्लक्षित कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी कलर्स मराठी देत आहे आणि त्याचा मी अविभाज्य भाग आहे. पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून काम करणार असून ही खूप मोठी जबाबदारी आहे. हा अनुभव माझ्यासाठी वेगळाच असेल.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News