500 कोरोनामुक्त रुग्णांनी दर्शविली प्लाझ्मा दानासाठी अनुकूलता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

धारावीत 27 जुलैपासून देशातील पहिले प्लाझ्मा दान शिबिर सुरू होत आहे.

धारावी : धारावीत 27 जुलैपासून देशातील पहिले प्लाझ्मा दान शिबिर सुरू होत आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी कोरोनामुक्त दात्यांच्या प्राथमिक चाचणीला आज सुरुवात करण्यात आली. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत धारावी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी अनुकूलता दर्शविली आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत यातील सुमारे 50 जणांची प्राथमिक चाचणी शुक्रवारी धारावीत खासदार शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या दात्यांमध्ये धारावीतील नागरिक, पोलिस अधिकारी, डॉक्‍टर्स, राजकीय कार्यकर्ते आदींचा समावेश होता. यावेळी मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. अनिल पाचनेकर, नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष वसंत नकाशे, नगरसेविका मरिअम्मल मुत्तू तेवर, धारावीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश नांगरे, पालिका अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News