भाऊ हा हॅकर तरी कोण ? बिग बीं नंतर आता अदनान सामीचं ट्विटर अकाऊंट हॅक

सकाळ वूत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • आता सिंगर अदनान सामी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

  • अकाऊंटवर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो 

मुंबई : बॉलिवूड बीग-बी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी हॅक करण्यात आलं. त्यानंतर आता सिंगर अदनान सामी यांचं ट्विटर अकाऊंट ही हॅक केलं गेलं आहे. अदनान यांचं अकाऊंट हॅक होताच त्यांचा प्रोफाईल फोटो, कव्हर फोटो आणि बायो बदलण्यात आला आहे. तसंच त्यांच्या अकाऊंटवरून पाकिस्तान समर्थनात ट्विट करण्यात आलं आहे. 
अदनान सामी यांच्या प्रोफाईल फोटोमध्ये त्यांच्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यांच्या कव्हर फोटोवर तुर्कस्तानचा झेंडा अपलोड केल्याचा दिसतोय. अदनान सामी यांच्या बायोमध्ये 'Ayyıldız Tim Love Pakistan' लिहिण्यात आलं आहे. इमरान यांचं अकाऊंट तुर्कस्तानच्या कोणत्यातरी प्रो-पाकिस्तान हॅकर ग्रुपनं हे अकाऊंट हॅक केलं आहे. अदनान सामी यांच्या आधी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर हॅंडल देखील अशाच अंदाजात हॅक झालं होतं. 
अदनान सामी यांचं अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यांच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं की, जो कोणी आमचा सहकारी देश पाकिस्तानची फसवणूक करण्याची हिंमत करेल, तो आपल्या प्रोफाईल फोटोमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान आणि इथल्या झेंडाचा फोटो बघाल. या ट्विटसोबत इमरान खान यांना देखील टॅग करण्यात आलं आहे. 

अमिताभ बच्चन यांनी पुन्हा ट्विट करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी गहन अर्थ असलेलं पहिलं ट्विट शेअर केलं.
‘सिर्फ शब्दों से न करना, किसी के वजूद की पहचान...हर कोई , उतना कह नही पाता...जितना समझता और महसूस करता है...’ असं ट्विट करताच त्यांच्या फॉलोअर्सने यावर बऱ्याच कमेन्ट करत या सायबर हल्ल्याची निंदा केली. त्याचसोबत त्यांच्यावर असलेलं त्यांच्या चाहत्यांचं प्रेम सुद्धा या कमेन्ट्समधून पाहायला मिळालं.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News