वास्तव... 

नेहा साळुंखे, नागठाणे
Saturday, 15 August 2020
  • तुमच्यासारखे आलिशान फ्लॅटमध्ये डायनिंग टेबलवर बसून डिनर नाही करू शकत आम्ही, पण माझ्या चंद्रमौळी झोपडीत सारवलेल्या जमिनीवर बसून कांदा-भाकर-चटणी खायची सवय आहे आम्हाला.

तुमच्यासारखे आलिशान फ्लॅटमध्ये डायनिंग टेबलवर बसून डिनर नाही करू शकत आम्ही, पण माझ्या चंद्रमौळी झोपडीत सारवलेल्या जमिनीवर बसून कांदा-भाकर-चटणी खायची सवय आहे आम्हाला. तुमच्यासारख्या लक्झरी गाडीतून चकाकणारे बूट, नवीन दप्तर, नवीन पुस्तक नसतील घेवून जात स्कूल मध्ये माझी पोरं, पण फाटकी पिशवी, जुनी पुस्तकं,  तुटकी चप्पल आणि रोज २ किलोमीटरचा पायी प्रवास करून प्रामाणिक कलेक्टर होण्याची स्वप्न बघतात माझी पोरं.

तुमच्यासारखे एसी रूम मध्ये बसून कॉम्प्युटर वर काम करून ६ अंकी पगार नाही मिळत मला, पण उन्हातान्हात काळ्या मातीत राबून स्वाभिमानाने कमावलेले चार पैसे पण समाधानाची झोप देतात मला. तुमच्यासारखे मॉल-मल्टिप्लेक्स मध्ये नाही जाऊ शकत आम्ही, पण निसर्गाच्या हिरव्यागार साम्राज्यात गेल्यावर दुसऱ्या करमणुकीची गरजच पडत नाही हो आम्हाला.

अनावश्यक गोष्टींवर लाखो रुपये उधळणं क्षुल्लक आहे तुम्हाला, पण हजारोंच कर्ज फेडताना पण जीव द्यावा लागतो माझ्या भावांना. थोडक्यात काय साहेब; तुम्ही "इंडिया" मध्ये राहता आम्ही "भारतात" राहतो; पण फक्त १५ ऑगस्ट २६ जानेवारीला पांढरे कपडे घालून, हातात तिरंगा घेवून आणि बाकीच्या दिवशी भ्रष्टाचाराने कमावलेले काळे पैसे स्विस बँकेत विकून खोटी देशभक्ती नाही सिद्ध करावी लागत आम्हाला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News