या अभिनेत्रीची बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020

अनुष्का सेनने तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटवरून १२ वीच्या निकालाची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

या अभिनेत्रीची बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी

महाराष्ट्र - सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांचा आग्रहाखातर सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हिडिओ शेअर करत असतात. शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे त्यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत असते. त्यातचं ‘बालवीर’ फेम ही अभिनेत्री अनुष्का सेन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. पण यावेळी मात्र तीची पोस्ट व्हायरल व्हायला कारण वेगळं आहे, अनुष्का सेन आता तिच्या १२ वीच्या निकालामुळे अधिक चर्चेत आहे. 

अनुष्का सेनने तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटवरून १२ वीच्या निकालाची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. टिव्ही मालिकेच्या कामात इतकं व्यस्त शेड्यूल असूनही तीने चांगला अभ्यास करून १२ वीच्या परीक्षेत ८९.४ टक्के मिळविले आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. तसेच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे. 
 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल अचानक जाहीर केला. सीबीएसईने गुणवत्ता यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील पुणे विभागाचा निकाल ९०.२४ टक्के लागला आहे. त्याचबरोबर यंदाचा निकाल ८८.७८ टक्के लागला असून ५.३८ टक्क्यांनी त्यात वाढ झाली आहे. 

कोरोनाचा संसर्ग देशात सुरू असताना यंदाच्यावर्षी बारावीची परीक्षा सुरू होती. मात्र वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे काही विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या. पण कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची लक्षणे नसल्याने परीक्षा रद्द करून सरासरी गुणानुसार मार्क देऊन विद्यार्थ्यांना पास केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News