आसाराम बापूच्या बायोपिकमध्ये या अभिनेत्री झळकणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ )
Wednesday, 8 May 2019

या चित्रपटात आसाराम बापुची भुमिका कोन साकारणार याविषयी प्रेक्षकांत उत्सूकता निर्मान झाली होती.

मुंबई: अध्यात्मिक मार्ग सांगून महिलांवर अत्याचार करणारा स्वंयघोषित गुरू आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्रकार उशीनर मजूमदार यांनी 'गॉड ऑफ सिन: द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू'च्या जीवनावर हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याच पुस्तकावर निर्माते सुनिल बोहर बायोपिक बनवणार आहेत.
 
या चित्रपटात आसाराम बापुची भुमिका कोन साकारणार याविषयी प्रेक्षकांत उत्सूकता निर्मान झाली होती. या उत्सूकतेसा उशीनर मजूमदार यांनी पुर्ण विराम दिला. मजूमदार म्हणाले की, स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा प्रवास कसा झाला. इथपासून ते बलात्काराच्या आरोपावरील खटला कसा चालला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा कशी मिळाली या सगळ्या गोष्टी बायोपिकमध्ये असणार आहेत. या चित्रपटाने आसारामचे आयुष्य दाखवण्यापेक्षा त्याला जेलमध्ये पोहचवणाऱ्या शोभा भुताडे आणि चंचल मिश्रा या दोघींवर चित्रपटाच्या कथेत भर दिला पाहिजे असं मला वाटते. या दोन्ही महिलांच्या भूमिकांमध्ये सशक्त अभिनय करणाऱ्या अभिनेत्री पाहिजेत. अनुष्का शर्मा आणि आलिया भट्ट या दोघी भूमिकांसाठी उत्तम असतील' असं ते म्हणाले.   

निर्माते सुनील बोहरा यांनी गेल्या महिन्यात या पुस्तकाचे सर्व हक्क विकत घेतले आहेत. सध्या ते लेखकांना भेटत असून लवकरच स्क्रिप्टवर काम सुरू करणार आहेत. त्यानंतर चित्रपटातील कलाकारांची नावं निश्चित होतील. लवकरच हा चित्रपट पेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News