अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' चित्रपट ओटीटीवर सर्वांधिक लोकप्रिय; जाणून घ्या खास वैशिट्यै

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020

'दिल बेचार' हा चित्रपट अनेक दिवस पहिल्या क्रमांकावर होता. मात्र शकुंतला देवीच्या प्रदर्शनानंतर दिल बेचार दुसऱ्या क्रमांकावर गेला आणि शकुंतला देवीने एक नंबर पटकवला आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपटगृह बंद करण्यात आली. प्रेक्षकांनी आता घरीच बसून चित्रपट पाहण्यावर भर दिला. चित्रपट प्रदर्शिक करण्याचा मोर्चा दिग्दर्शकांनी ओटीटीकडे प्लॉटफार्मकडे  वळला. दिग्गज कलाकारांचे चित्रपट ओटीटी प्रदर्शित झाले आहेत. त्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांचा 'शकुंतला देवी' चित्रपद दोन आठवड्यापुर्वी ओटीटीवर प्रदर्शिक झाला, त्याला प्रेक्षकांकडून उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज पर्यंत ओटीटीवर हा चित्रपट सर्वांधिक जनतेनी पाहिला आहे. त्यामुळे चित्रपटाला पहिला क्रमांक मिळाला.  

'दिल बेचार' हा चित्रपट अनेक दिवस पहिल्या क्रमांकावर होता. मात्र शकुंतला देवीच्या प्रदर्शनानंतर दिल बेचार दुसऱ्या क्रमांकावर गेला आणि शकुंतला देवीने एक नंबर पटकवला आहे. अभिनेत्री बालन, सानिया मल्होत्रा, अभिनीत आणि मेनन यांनी 'शकुंतला देवी' चित्रपट दिगर्शित केला. ३१ जुलै रोजी हा प्रदर्शिक झाला होता. गेल्या आठवड्यात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान एक ट्रेंड सुरु झाला होता, त्या ट्रेंडमध्ये शकुतला देवी चित्रपतट पहिल्या क्रमांकावर होता. अशी माहिती ओरमेक्य मीडियाने ट्विटरद्वारे दिली.

चित्रपटात मुख्य कलाकार विद्या बालन, जिस्सू सेनगुप्तात, सान्य मल्होत्रा आणि अमित साधा आहेत. त्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. वास्तवाशी हा अभिनय  एकरुप होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले. शकुतला देवी (विद्या बालन) मोठी झाल्यावर गायिका, कलाकार होईल असे कुटुंबीयांना वाटत होते. मात्र भविष्यात वेगळेच घडले. ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती असे शंकुतला देवीने करुन दाखवले, हाडाची शिक्षिका, भविष्यवाणी, विविध विश्व रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावावर नोंदवले, त्यामुळे आवड आणि करियर वेगळे असू शकते हे प्रेक्षकांना नव्याने उमजले, त्यामुळे नवा विषय चर्चेला आला आणि शकुंलता देवी चित्रपट अधिक लोकप्रिय झाला.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News