चुकीच्या जागी स्पर्श केला म्हणून 'या' अभिनेत्रींने हिरोला मारली चापट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020
  • बॉलिवूड असोत किंवा हॉलिवूड कास्टिंग काऊचचा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. त्यामध्ये प्रामुख्याने अभिनेत्री बळी पडल्याचं समोर आलं आहे.

बॉलिवूड असोत किंवा हॉलिवूड कास्टिंग काऊचचा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. त्यामध्ये प्रामुख्याने अभिनेत्री बळी पडल्याचं समोर आलं आहे. अनेक अभिनेत्रींना कामाच्या ठिकाणी चुकीचा आणि वाईट अनुभव देखील आला आहे. मात्र आपल्याला आलेला अनुभव त्याच वेळी त्यांनी मोडीत काढून चक्क हिरोंच्या कानाखाली मारण्याची हिम्मत दाखवली आहे. यामध्ये बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंतच्या अभिनेत्रींचा समावेश आहे.  

राधिका आपटे 
यामध्ये राधिका आपटे या अभिनेत्रीने मारलेली चापट आजही सर्व बॉलिवूडकरांच्या लक्षात आहे. राधिका हीने विविध चित्रपटांमध्ये काम केले असून बोल्ड सिन देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. साऊथच्या एका सिनेमाच्या शुटिंगवेळी अभिनेत्याने तिच्या पायाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. तिला तो चुकीचा स्पर्श जाणवला. त्याचक्षणी संबंधित अभिनेत्याला तिने जोरात कानाखाली लगावली होती. 

रविना टंडन  
९० च्या दशकातील पॉप्युलर अभिनेत्री रविना टंडन हिने अनेक सुपरहिट सिनेमे बॉलीवूडला दिले आहेत. तिने गेल्यावर्षी तीनवेळा आपल्या सहकलाकाराला कानाखाली मारली होती. यावरून संपूर्ण बॉलिवूडमध्ये चर्चा झाली होती, मात्र तो सिन चित्रपटाचा एक भाग असल्याचे नंतर लक्षात आले. 

गीतिका त्यागी 
नुकतीच बॉलिवूडमध्ये एंट्री केलेली गीतिका त्यागी हिने यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड निर्माते सुभाष कपूर आणि गीतिका सोबत गेले होते. त्यावेळी सुभाषने गीतिकाला चुकीच्या पद्धतीने जबरदस्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करत गीतिकाने भर कायर्क्रमात सुभाषच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर दोघांमध्ये गैरसमज दूर होऊन गीतिकाने माफी देखील मागितल्याचा चर्चा होत होत्या. 

दरम्यान, यामध्ये मी टू प्रकरण गाजवणारी तनुश्री दत्त हिने देखील शूटिंगदरम्यान आपल्या सहकलाकाराला मारल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये अनेक अभिनेत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये  कल्की कोचीन, स्वरा भास्कर, सुरवीन चावला, कंगना रानौत, शर्लिन चोप्रा, सुचित्रा कुलकर्णी, चित्रगंधा सिंग, अशा फेमस अभिनेत्रीचा समावेश आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News