अभिनेता शशांक उदापूरकर दिग्दर्शनाकडे वळला... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

अभिनेता-दिग्दर्शक शशांक उदापूरकर अनेक चित्रपटात अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर आल्यानंतर, लेखन आणि आता दिग्दर्शनाकडे वळला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘प्रवास’ हा पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे मुख्य भूमिकेत आहेत. ‘जे शेष आहे, ते विशेष आहे’, अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘प्रवास’बद्दल शशांक सांगतो, ‘या चित्रपटासाठी मामांचा आणि पद्मिनीजींचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. दोघेही या चित्रपटाच्या कथेसाठी खूपच उत्सुक होते.

विक्रम गोखले, श्रेयस तळपदे, रजत कपूर या सर्वांचाही खूप सपोर्ट मिळाला. मराठीत पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करण्याचा फारच छान अनुभव होता.’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News