या कारणामुळे सई ताम्हणकर जखमी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

सईने पुढील वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ हॉस्पिटल गाठले. उपचारादरम्यान सईच्या पायाला मोठा फॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले.

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून सई ताम्हणकर ही "मिमी" या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त होती मात्र आता तिला या चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावर सोडून सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

या सक्तीच्या विश्रांतीचे कारण म्हणजे तिच्या पायाला झालेली गंभीर दुखापत. मराठमोळी अभिनेत्री अशी ओळख संपादीत करणारी सई ताम्हणकर ही "मला आई व्हायचंय" या मराठी चित्रपटाचे हिंदी रीमेक असलेला " मिमी " ह्या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान मध्ये सुरु असताना त्यादिवसाचे काम आटोपून हॉटेलवर विश्रांतीसाठी परतत असताना तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

सईने पुढील वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ हॉस्पिटल गाठले. उपचारादरम्यान सईच्या पायाला मोठा फॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डॉक्टरांनी तिला तब्बल २ महिन्याची सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे असे समजते.  त्यामुळे सई ताम्हणकर  आपल्या पायाच्या दुखापतीवर मात करून "मिमी" या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार  हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News