...म्हणून अभिनेत्री प्रियंका बनली टोरांटो चित्रपट महोत्सवाची ब्रॅण्ड ऍम्बॅसिड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 June 2020
  • टोरांटो फिल्म फेस्टिव्हल 10 ते 20 सप्टेंबर या कालावधीत होणार

मुंबई :  प्रियांका चोप्राने हिंदी चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाची यशस्वी इनिंग खेळतानाच तिने स्वतःच्या प्रॉडक्‍शन हाऊसतर्फे चांगल्या चित्रपटांची निर्मितीही केली. संसार थाटल्यानंतरही चित्रपटसृष्टीत व्यग्र असलेल्या प्रियांकाची निवड टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर म्हणून झाली आहे.

दर वर्षी टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केला जातो. जगातील दर्जेदार आणि आशयघन चित्रपट या महोत्सवात दाखवले जातात. या वर्षी हा चित्रपट महोत्सव 10 ते 20 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. चित्रपटाच्या प्रवेशिका ऑनलाईन मागवण्यात आल्या आहेत. या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात प्रियांका चोप्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याबाबत प्रियांका म्हणाली, "मला खूप आनंद झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक चांगले प्रमोट करण्याची संधी आहे. या महोत्सवात दिग्दर्शक अनुराग कश्‍यप याचीही निवड करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News