अभिनेत्री प्रीतम कागणे ‘वाजवूया बॅंड बाजा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 January 2020

नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अनावरण करण्यात आले. पोस्टरमध्ये प्रीतमने वेस्टर्न कपडे परिधान केलेले असून तिची या चित्रपटातील भूमिका कशा प्रकारची असणार, हे गुलदस्त्यातच आहे.

अभिनेत्री प्रीतम कागणेच्या ‘अहिल्या’ आणि ‘हलाला’ चित्रपटातील भूमिकांचे फारच कौतुक झालं. आता ती ‘वाजवूया बॅंड बाजा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अनावरण करण्यात आले. पोस्टरमध्ये प्रीतमने वेस्टर्न कपडे परिधान केलेले असून तिची या चित्रपटातील भूमिका कशा प्रकारची असणार, हे गुलदस्त्यातच आहे.

पोस्टरमध्ये तिच्यासोबत अभिनेता मंगेश देसाई, समीर धर्माधिकारी आणि चिन्मय उदगीरकर हातात वरमाला घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. शिवाजी लोटन पाटील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २० मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News