शाहरूख खानच्या आगामी चित्रपटात मूख्य भूमिकेत ‘ही’ अभिनेत्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 March 2020
शाहरुख खानचे चाहते बरेच दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत होते. याबाबत बरेचसे अंदाज बांधले जात आहे पण शाहरुखने अद्याप याबद्दल कोणतीही पुष्टी केली नाही.

शाहरुख खानचे चाहते बरेच दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत होते. याबाबत बरेचसे अंदाज बांधले जात आहे पण शाहरुखने अद्याप याबद्दल कोणतीही पुष्टी केली नाही. गेल्या वेळी शाहरुख खानने आनंद एल रायचा चित्रपट ‘जीरो’ केला होता आणि त्यात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नव्हता आणि त्यानंतर शाहरुखने चित्रपटातू बराच काळ ब्रेक घेतला होता.

मात्र, ‘फिल्मफेअर’च्या खास रिपोरर्टनुसार, आलिया भट्ट पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटात दिसू शकेल. या रिपोर्टनुसार, शाहरुख खान दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या पुढच्या चित्रपटात भूमिका साकारण्याची शक्यता आहे, ज्याने हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा मागील चित्रपट 'वॉर' दिग्दर्शित केला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला.

प्रोजेक्ट सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात शाहरुख आलियाच्या विरुध्द कास्ट होऊ शकतो, जो शाहरूखसोबत 'डियर जिंदगी' चित्रपटात दिसला होता. गौरी शिंदेच्या दिग्दर्शनात 'डियर जिंदगी' चे समीक्षकांकडून चांगलेच कौतुक झाले आणि शाहरुख-आलिया जोडीलाही लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे.

याबद्दल अद्याप कोणताही निश्चित अहवाल मिळालेला नाही, परंतु तसे झाल्यास शाहरुख आलियाची जोडी पुन्हा एकदा पाहणे मनोरंजक ठरेल. सध्या कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडमधील सर्व चित्रपटांचे प्रदर्शन आणि शूटिंग रखडले आहे. आलिया सध्या तिचा पुढचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातही काम करत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News