अभिनेत्री नूपुर सेनन बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 January 2020

आता ती तिच्या बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. अक्षयची मुख्य भूमिका असलेल्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘फिलहाल’ या गाण्यातून अभिनेता अक्षयकुमारसोबत झळकली होती. या गाण्याने तिची वेगळी ओळख निर्माण झाली. आता ती तिच्या बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. अक्षयची मुख्य भूमिका असलेल्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यासाठी तिची ‘लूक टेस्ट’ही घेण्यात आली आहे. चित्रपटात ती अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अक्षय-नूपुरची जोडी ‘फिलहाल २’ या गाण्यातही झळकणार असल्याची चर्चा आहे. नूपुरला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News