अभिनेत्री नोराच्या 'या' व्हिडीओने घातला सोशल मीडियावर धुमाकुळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 April 2020
  • अभिनेत्री नोरा फतेहीच्या डान्सिंग कौशल्याचे लाखो चाहते आहेत.

अभिनेत्री नोरा फतेहीच्या डान्सिंग कौशल्याचे लाखो चाहते आहेत. बाटला हाऊस, मरजावां, सत्यमेव जयते यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तिच्यावर खास गाणी चित्रीत करण्यात आली होती. नोराचे रूपेरी पडद्यावरील ठुमके पाहून थिएटरमधलं पब्लिकही थक्क झालं होतं.

स्ट्रीट डान्सर 3-डी चित्रपटात तर डान्ससह ती उत्तम अभिनय करतानाही दिसली. आता लॉकडाऊनच्या काळातही आपल्या चाहत्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून ती पुरेपूर काळजी घेत आहे. घरच्या घरीच नोरा नृत्य सादर करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. नोराचा यातीलच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय. या व्हिडीओमध्ये नोरा डान्ससह वर्कआऊटदेखील करताना दिसत आहे. घरातच असताना फिट ऍण्ड फाईन कसं राहायचं हे सतत ती तिच्या व्हिडीओमधून प्रेक्षकांना सांगत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News