मुंबई :- टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री तृप्ती शंखधर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने आपल्या वडिलांना बदल सांगते आहे की, वडिलांपासून तिच्या जीवाला धोका आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील रहिवासी कुमकुम भाग्य फेम तृप्ती शंखधर यांचे वडील राम रतन शंकधर यांनी त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न करायला सांगत आहेत असा दावा व्हिडिओमध्ये ऐकू येतो. इतकेच नाही तर तृप्तीच्या वडिलांनी त्यांचे म्हणणे न ऐकल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत तृप्ती यांनी व्हिडिओ शेअर करताना बरेली पोलिसांकडून संरक्षण मागितले आहे.
तृप्तीसोबत तिच्या आईनेही घर सोडलं. आईनेही नवऱ्यावर मारपीट केल्याचा आरोप केला. तृप्तीची आई म्हणाली की, "मला बाहेर जाऊ दिलं जायचं नाही आणि मला कोणाशी बोलूही दिलं जायचं नाही. या सर्व गोष्टींमुळे मी खूप अस्वस्थ होते.' बारादरी येथील ग्रीन पार्क रहिवासी राम रतन शंखधर यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.
त्यांची मोठी मुलगी दिप्ती पीसीएसची तयारी करत आहे. त्याचवेळी लहान मुलगी तृप्ती शंखधर (१९) ही अभिनेत्री आहे. गेल्या वर्षभरापासून ती मुंबईत राहत आहे. तृप्ती होळीसाठी घरी आली होती त्यानंतर ती लॉकडाउनमुळे घरीच राहिली.
तृप्तीने अपलोड केला व्हिडिओ
दरम्यान, तिचा एक व्हिडिओ अचानक इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, यात ती आपल्या आईसोबत दिसत आहे. तृप्तीने वडील राम रतन यांच्यावर जीवे मारण्याचा आरोप केलाय. यासोबतच ती म्हणाली की, 'बाबांनीच मला मुंबईत अभिनेत्री होण्यासाठी पाठवले होते यानंतर माझा फक्त एकच सिनेमा प्रदर्शित झाला. बाबा आता २८ वर्षीय मुलाशी लग्न करण्याची जबरदस्ती करत होते. त्याच्याशी लग्न केलं नाही तर ठार मारू असे ही ते म्हणाले.’ तृप्तीने स्पष्ट केले की, यानंतर ती आपल्या आईसह घरातून पळून गेली आणि हा व्हिडिओ अपलोड केला.
वडिलांनी दिले स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणात तृप्तीच्या वडिलांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'लग्नासाठी तिच्यावर कुठलाही दबाव टाकला नाही. अभिनेता सुशांतसिंहचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला त्यानंतर मलाही भीती वाटू लागली आहे. याचमुळे मला आता मुलीचे लग्न करायचे आहे. याच कारणास्तव मुंबईत तुप्तीने एकटे राहू नये असे ही मला वाटते. पण तिला मुंबईला एकटेच रहायचे होते. रागात मी तिला कानाखाली मारली. त्यानंतर मी अन्न- जल त्याग केला.'
याप्रकरणी एसपी सिटी रवींद्र कुमार म्हणाले की, 'अभिनेत्री तक्रारीवरून तिच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुलगीही पोलीस ठाण्यात आहे. लेखी तक्रार मिळाल्यावरच गुन्हा दाखल करण्यात येईल’