अभिनेत्री कंगना रानौतची तोफ हृतिकवर; पाहा काय म्हणाली...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 June 2020
  • एका मुलाखतीत दिली माहिती

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ती सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर हा मुद्दा हिंदी चित्रपटसृष्टीतील चर्चेचा विषय ठरला होता. आता तिने पुन्हा तोंडसुख घेतले आहे ते अभिनेता हृतिक रोशनवर. हृतिक भाड्याच्या घरात राहत होता आणि त्या घराचे भाडे त्याचे वडील भरत होते, असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे आणि त्यामुळे पुन्हा हृतिक आणि कंगना यांच्या वादाला नव्याने तोंड फुटले आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यातील द्वद्व सगळ्यांना माहिती आहे. कंगनाने हृतिकवर विविध आरोप केले आणि हृतिकनेही तिच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काहीसा हा वाद थंडावला होता, परंतु आता पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. कंगनाने एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की जेव्हा मी हृतिकबरोबर काम करीत होते, तेव्हा हृतिकने आपल्या एका मित्राला मी त्याच्या पैशांच्या मागे आहे असे म्हटले होते. याबद्दल बोलताना आता तिने आपली सफाई दिली आहे. ती म्हणते, की मला गर्व आहे, मी मुंबईत माझे स्वतःचे घर आहे आणि स्वतःचे आलिशान ऑफिस आहे. हृतिक भाड्याच्या घरात राहतो आणि त्याचे भाडे त्याचे वडील भरतात, असे कंगनाचे म्हणणे आहे.

हृतिकच्या पैशांच्या मागे असल्याचा आरोप

जेव्हा आमची न्यायालयीन लढाई सुरू झाली, तेव्हा काही जणांनी मी छोट्या शहरातून आली आहे आणि हृतिकच्या पैशांच्या मागे आहे असे म्हटले होते. त्या वेळी मी पैशांच्या मागे नाही, हा मुद्दा कसा खोडून काढावा या विचारात होते, पण तेव्हा मी हादेखील विचार केला, की माझे स्वतःचे घर आणि ऑफिस आहे. त्यामुळे मी अशा बाबींकडे दुर्लक्ष केले, असेही तिचे म्हणणे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News