छोट्या पडद्यावरील 'या' अभिनेत्रीला बॉलीवूडची ओढ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 13 March 2019

मराठी कलाकारांचा सध्या बॉलीवूडकडे जास्त कल दिसतोय. अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, अमृता सुभाष पाठोपाठ पूजा सावंतनेही बॉलीवूडमध्ये एण्ट्री केली आहे. आता छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे नावारूपाला आलेल्या आकांक्षा साखरकरला बॉलीवूडचे वेध लागले आहेत.

आकांशा मुळची नागपूरची. तिने ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. शिवाय, सोनी मराठी वाहिनीवरील ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेत सध्या ती ‘स्वरा’ नावाचं पात्र साकारत आहे.

आकांक्षा सांगते, ‘मराठी मालिकांमुळेच मी नावारूपाला आले. सध्या मी चित्रपटांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे.

बॉलीवूडमध्ये काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. त्याचबरोबरीने मराठी चित्रपटसृष्टीला माझं प्रथम प्राधान्य असेल.’ सध्यातरी आकांक्षा एखाद्या बॉलीवूड चित्रपटाच्या संधीच्या शोधात आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News