"या" बॉलिवूड अभिनेत्रीला जडलाय झोपेत चालण्याचा आजार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 September 2019
  • एका अभिनेत्रीनं ती आजारग्रस्त असल्याची माहिती तिच्या ट्विटरवरु दिली आहे.
  • काही दिवसांपासून बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यामुळे चर्चेत आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना विशिष्ट आजाराने ग्रासले असल्याचे आपल्याला पहायला मिळालं आहे. नुकतंच एका अभिनेत्रीने आपल्या आजाराबाबत कबुली दिली आहे. 

अभिनेत्री इलियाना डिक्रुझनं आपल्याला एक गंभीर आजार असल्याची नुकतीच माहिती साेशल मिडियावर दिली आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग चिंतेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं तिला असल्याचं कबुल केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं ती आजारग्रस्त असल्याची माहिती तिच्या ट्विटरवरु दिली आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रुझनं मागच्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यामुळे चर्चेत आहे. या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले असून त्यामुळे आता दोघांपैकी कोणीही पॅचअप करण्याच्या मनस्थितीत नाही. अशात आता इलियानानं तिला झालेल्या एका आजाराची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

दरम्यान, इलियानानं नुकतच तिच्या ट्विटरवर एक पोस्ट लिहिलीआहे. ज्यामध्ये तिनं तिच्या आजाराविषयी माहिती दिली आहे. तिनं लिहिलं, मी आता ही गोष्ट पूर्णपणे स्वीकारली आहे की मला झोपेत चालण्याचा आजार झाला आहे. ज्यामुळे अनेकदा माझ्या पायांना सूज येते तसेच मी जखमी सुद्धा होत आहे. सुरुवातीला हे सर्व मला खूपच रहस्यमयी वाटलं. मात्र आता मी झोपेत चालत असल्यानं होत असल्याचं माझ्या लक्षात येत आहे . कारण या व्यतिरिक्त विचार करण्याचा कोणताही पर्याय उरत नाही.

इलियानानं अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्याशी आजाराविषयीची माहिती शेअर केली आहे. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. काहींनी तिला डॉक्टर जाण्याचा सल्ला दिला तर काही दिवसांसाठी तू तुझ्या रुममध्ये कॅमेरा लाव असं म्हटलं आहे.

दरम्यान, एका युजरनं लिहिलं, जेव्हा तु उठतेस त्यावेळी तु जर तुझ्या बेडवर असशील की, कोणत्या दुसऱ्या जागेवर जर तू तुझ्या बेड ऐवजी दुसऱ्या जागेवर असशील तर तु स्लीप वॉकिंगची शिकार झाली आहे, असे म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News