'ही' अभिनेत्री करणार डिजिटल चित्रपटात काम

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 18 February 2019

चित्रपट, मालिकांप्रमाणेच सध्या वेबसीरिजलाही तितकंच महत्त्व दिलं जातंय. अभिनेत्री मानवी गगरूही नावारूपाला आली ती ‘फोर मोअर शॉट्‌स प्लीज’ हा वेबसीरिजमुळे. मानवीला ‘वेब क्वीन’ ही पदवीही मिळाली आहे. आता ती चक्क चित्रपटांत काम करणार आहे.

झी ५च्या ‘३७७ अब नॉर्मल’ या चित्रपटासाठी तिची निवड केली आहे. झी ५च्या या डिजिटल चित्रपटाचे दिग्दर्शन फारूक कबीर यांनी केले आहे; तर आदित्य सिंग यांनी निर्मिती केली आहे. मानवी म्हणते, ‘या चित्रपटाविषयी मला विचारले तेव्हा मी लगेचच होकार दिला.

कारण सामाजिक समानतेबाबत माझं मत कायम ठाम राहिलं आहे आणि लैंगिक समानता तर महत्त्वपूर्ण विषय आहे. असा चित्रपट करण्यासाठी माझी निवड करण्यात आली आणि मी होकार दिला.’  

या चित्रपटात मानवीबरोबरच तन्वी आझमी, मोहम्मद आयुब, शशांक अरोरा आणि कुमुद मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. आता मानवीने खऱ्या अर्थाने तिच्या करिअरच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News