ही अभिनेत्री काढणार स्वत:चाच बायोपिक

यिनबझ ऑनलाईन टीम
Friday, 15 February 2019

कंगना राणौतने ‘मणिकर्णिका : द क्‍वीन ऑफ झाँसी’ चित्रपटामधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या या चित्रपटाची सगळीकडे वाहवाहही झाली. आता बॉलीवूडची ही क्वीन स्वतःच्या बायोपिक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

खुद्द कंगनानेच याबाबत खुलासा केला आहे. ‘माझ्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य आहे. पण माझ्या या चरित्रपटात कोणतीच वादग्रस्त बाजू मांडण्यात येणार नाही. माझ्या आयुष्यातील सुखद आणि आनंददायी प्रवास तसेच माझा आतापर्यंतचा बॉलीवूडमधील प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे’, असे कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. कंगनाने तिच्या या बायोपिकवर काम करायला सुरुवात केली आहे. याच वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. एका छोट्याशा खेडेगावातून आलेली कंगना आज बॉलीवूडमध्ये मानाने उभी आहे. तिच्या जिद्दीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News