अभिनेत्री आलिया भट्ट ‘गंगूबाई’च्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020

कामाठीपुरामधील ‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. नुकताच या भूमिकेतील आलियाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. त्यातील दोन फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलिया भटच्या ‘गंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ती फारच चर्चेत होती. या चित्रपटात ती ‘गंगूबाई’ची भूमिका साकारत आहे.

कामाठीपुरामधील ‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. नुकताच या भूमिकेतील आलियाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. त्यातील दोन फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

एका फोटोत ती भिंतीला टेकून बसली आहे आणि तिच्या बाजूला बंदूक ठेवली आहे. दुसऱ्या फोटो हा ब्लॅक ॲण्ड व्हाईट असून तिच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत आहे. त्याचबरोबर फोटोवर ‘माफिया क्वीन’ असेही लिहिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साली यांचेआहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News