या अभिनेत्याच्या पत्नीला झाली करोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 March 2020

आता तर चक्क इडरिसच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली आहे. ज्यावेळी इडरिसला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

नवी दिल्ली - करोना या संसर्गजन्य आजाराने अवघ्या देशाला ग्रासलं आहे. आत्तापर्यंत जगभरात या आजाराने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. तसेच याची लागण लाखो लोकांना झाली असल्याचे काही जाणकार डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे करोनाने हॉलिवूडकरांना सुध्दा सोडलेलं नाही. सुप्रसिध्द अभिनेता टॉम हॅंक्स याला करोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपुर्वीचं स्पष्ट झाले होते. त्यानंतर अभिनेत्री ओल्गा कुरीलेन्को आणि अभिनेता इडरिस एल्बा यालाही कोरोनाची लागण झाली होती. 

आता तर चक्क इडरिसच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली आहे. ज्यावेळी इडरिसला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी पत्नीला लांब राहाण्याचा सल्ला डॉ. दिला होता. पण त्याची काळजी घेण्यासाठी ती सतत त्याच्याजवळ असल्याने तिचा रिपोर्ट सुध्दा  पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे ती अजिबात घाबरलेली नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News