गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी या अभिनेत्याचा ३० तास प्रवास 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020

अंशुमनच्या गर्लफ्रेंडचे नाव Sierra असून दोघांची पहिली ओळख हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा परिसरात झाली होती. तिथं अंशुमन आईच्या उपचारासाठी गेला होता. अंशुमनने इन्स्टाग्रामावर गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत साखरपूडा झाल्याचे सांगितले आहे.

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी या अभिनेत्याचा ३० तास प्रवास 

‘लव सेक्स और धोखा’ आणि ‘नो फादर्स इन कश्मीर’ या दोन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यारा अभिनेता अंशुमन झाने याने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तब्बत ३० तास पीपीई किट घालून प्रवास केल्याने त्याचा चाहतावर्ग आश्र्चर्य चकीत झाला आहे. आता त्याने तिथे प्रेयसीसोबत साखरपुडा सुध्दा केला आहे. 

कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेकजण घरीच राहण्याला पसंती देत आहेत, कारण कोरोनाची पेशंट कमी होत नाहीत. दिवसेंदिवस वाढतचं आहेत. अशा परिस्थिती अनेकांना आपलं घरचं सुरक्षित वाटत आहे. त्याचपध्दतीने अभिनेता अंशुमन झाने हा सुध्दा घरीच होता. मागील चार महिन्यांपासून तो घरी असल्याने जेवण बनवायला शिकला. जानेवारी महिन्यात आईचं निधन झाल्यापासून त्याला एकटेपणा जाणवत होता. सतत वाटणा-या एकटेपणामुळे त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. 

 अशुंमन वंदे मातरम फ्लाइने अमेरिकेला केला, त्याचबरोबर त्याने ३० तास पीपीई किट घातले होते. प्रवासादरम्यान त्याने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थांबा घेतला नाही. विशेष म्हणजे प्रवासादरम्यान त्याने फक्त ड्राय फुड्स खाले. अमेरिकेत पोहचल्यानंतर दोन आठवडे होम क्वारंटाईन केल्यानंतर साखरपुडा केला. 

अंशुमनच्या गर्लफ्रेंडचे नाव Sierra असून दोघांची पहिली ओळख हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा परिसरात झाली होती. तिथं अंशुमन आईच्या उपचारासाठी गेला होता. अंशुमनने इन्स्टाग्रामावर गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत साखरपूडा झाल्याचे सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News