आनंद कुमारच्या बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता दिसणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 29 March 2019

अभिनेता हृतिक रोशन पहिल्यांदाच एका बायोपिक चित्रपटात काम करणार म्हटल्यावर त्याचा नवा लूक पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ चित्रपटात तो काम करतोय.

बहुदा आनंद कुमार यांच्या भूमिकेने बॉलीवूडच्या या हॅण्डसम हॅंकला आपलंसं केलं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान फावल्या वेळेत अधिकाधिक वेळ विद्यार्थ्यांबरोबर घालवत आहे. ‘सुपर ३०’मध्ये तर हृतिक मुलांना शिक्षणाचे धडे देताना दिसणारच आहे.

पण तो सेटवरही मुलांमध्ये रमला असून त्यांना चांगल्या गोष्टींचं ज्ञान देतोय. या चित्रपटात आनंद कुमार यांचं शिक्षणाप्रती असणारं प्रेम आणि त्यांचा एकंदरीत प्रवास दाखवणार आहे. हृतिक ऑफस्क्रीन करत असलेली मस्ती ऑनस्क्रीनही तितकीच रंगणार यात काही शंका नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News