‘मादाम तुसाद म्युझियम’मध्ये 'या' अभिनेत्याचा वॅक्‍स स्टॅच्यू

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Monday, 20 May 2019

अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री दीपिका पदुकोण, दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचे सिंगापूर ‘मादाम तुसाद म्युझियम’ येथे वॅक्‍स स्टॅच्यू बनवण्यात आले आहेत.

अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री दीपिका पदुकोण, दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचे सिंगापूर ‘मादाम तुसाद म्युझियम’ येथे वॅक्‍स स्टॅच्यू बनवण्यात आले आहेत. त्यात आता बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचाही नंबर लागला आहे.

 नुकताच त्याचा ‘मादाम तुसाद म्युझियम’मध्ये मेणाचा पुतळा बनवण्यात आला आणि त्याचे अनावरण करण्यासाठी शाहिद सिंगापूरला गेला होता. तेथे त्याने पुतळ्याचे अनावरण केले आणि पुतळ्यासोबत फोटोज काढताना दिसून आला.

 या वेळी त्याने त्याच्या मेणाच्या पुतळ्यासारखेच कपडे परिधान करून सेम पोज देऊन फोटो काढला. हा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला ‘ट्‌विनिंग’ असे कॅप्शन दिले. या वेळी शाहिदसोबत पत्नी मीरा कपूर होती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News