'या' अभिनेत्याने केला आपला विवस्त्र फोटो अपलोड आणि मग घडलं असं काही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020
  • बॉलीवूड सेलिब्रिटी नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात.  सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे अनेकवेळा ते ट्रोल होताना दिसतात. तर काही वेळा त्यांच्या पोस्टचं कौतुकही केलं जातं. पण काही वेळा सोशल मीडियावर कमी अ‍ॅक्टिव्ह असणारे आणि क्वचितच पोस्ट करणारेही चर्चेत येताना दिसतात.

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात.  सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे अनेकवेळा ते ट्रोल होताना दिसतात. तर काही वेळा त्यांच्या पोस्टचं कौतुकही केलं जातं. पण काही वेळा सोशल मीडियावर कमी अ‍ॅक्टिव्ह असणारे आणि क्वचितच पोस्ट करणारेही चर्चेत येताना दिसतात. असाच काहीस घडलंय अभिनेता राहुल खन्नासोबत. जेष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्नाने  दीपा मेहता दिग्दर्शित '1947 अर्थ' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.पुढे  'दिल कबड्डी', 'लव्ह आज कल', 'वेक अप सिड' आणि 'फीयर फाइल्स'  यांसारख्या चित्रपटात काम केले. वास्तविक पाहता राहुलने मोजक्याच चित्रपटात काम केले असले तरी सिनेसृष्टीत त्याचं वेगळं स्थान आहे.

राहुलने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. आणि त्या एका फोटोने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली. या फोटोवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या आणि रंजक अशा कमेंटही केल्या आहेत. एवढेच नाही तर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीही या फोटोला कमेंट केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I feel there’s a lesson here about being in the right place at the right time.

A post shared by Rahul Khanna (@mrkhanna) on

दिग्दर्शक करण जोहरने या फोटोवर 'उफ …' अशी कमेंट केली आहे. तर 'मला वाटते की तो काच फोडण्यास तयार आहे.' अशी कमेंट मलायका अरोराने केली आहे. या फोटोला शेअर केल्यानंतर काही क्षणातच  26 हजारापेक्षा अधिक लाईक आणि   1700 हून अधिक कमेंट आल्या आहेत. सोशल मीडियावर हा फोटो जास्तीत जास्त व्हायरल होत असून त्याला नेटकऱ्यांची अधिकाधिक पसंती मिळत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News