हा अभिनेता मुलाला म्हणतोय, आता तू माझ्यापेक्षा उंच आणि सुंदर आहेस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020

हा अभिनेता मुलाला म्हणतोय, आता तू माझ्यापेक्षा उंच आणि सुंदर आहेस

अभिनेता अक्षय कुमारने मुलगा आरवचा वाढदिवस नुकताच साजरा केला. आठवण म्हणून अक्षयने सोशल मीडियावरती खास पोस्ट शेअर केली होती. त्याचा मुलगा लहान असताना होळी खेळताना तो फोटो आहे. व्हायरल केलेल्या फोटोमध्ये त्याने म्हटलं आहे की मुलगा किती मोठा झाला यावर माझा विश्वास बसत नाही. शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षयने आरवला आपल्या हातात धरले असून हे दोघेही होळीच्या रंगात भिजलेले दिसत आहेत. अक्षयच्या कॅप्शनमध्ये आरव माझा मुलगा किती मोठा झाला यावर माझा विश्वास बसत नाही. माझ्या मुलाला १८ वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! आता तू माझ्यापेक्षा उंच आहेस, माझ्यापेक्षा देखणा सुंदर आहेस असंही अक्षयने म्हटलं आहे.

अक्षयची पत्नी, ट्विंकल खन्ना यांनीही मंगळवारी आरव यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “आरवला १८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! मुलगा अठरा वर्षाचा झाल्याने दोघांनाही आनंद झाला. तू लवकरचं यशस्वी होशील असंही त्यांनी म्हटलं आहे.

आरव लहान असल्यापासून त्याला आम्ही चांगल्या गोष्टी शिकवल्या, घरी कोणी नसताना लाईट बंद करण्यापासून त्याला सगळ्या गोष्टी आम्ही शिकवल्या आहेत.  त्यामध्ये इतरांचा आदर करणे, दयाळूपणा, शिष्टाचार इत्यादी गोष्टी आरवला समजून सांगितल्याचं ट्विंकल खन्नाने लिहिलं आहे. लहान असल्यापासून आम्ही सांगेल तसं वागत आलात, आता तू तुझ्या स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत आहेत, मी हे तुझ वागणं जाणण्यास सुरूवात केली आहे असंही ट्विंकल खन्ना यांनी स्पष्ट केलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News