अभिनेता परेश रावल  डॉ. कलाम यांच्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 January 2020

आता लवकरच ते माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात ते अब्दुल कलाम यांची भूमिका साकारणार आहेत.

अभिनेता परेश रावल यांनी विनोदी भूमिकांबरोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका साकारून बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

आता लवकरच ते माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात ते अब्दुल कलाम यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही;

मात्र त्यांनी स्वतः समाजमाध्यमावर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासंबंधीची पोस्ट शेअर करत चाहत्यांना या चित्रपटाची माहिती दिली आहे. त्यामुळे परेश यांना या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News