काजोलला लग्नापूर्वी आवडायचा 'हा' अभिनेता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 May 2019

करण जोहरने याबाबत खुलासा केला आहे. काजोलचे लग्न अजय देवगण सोबत होण्याआधी काजोलला कोणत्या अभिनेत्यावर क्रश होता हे करणने सांगितले आहे. काजोलला अक्षय कुमारवर क्रश होता असा खुलासा करणने केला आहे.

बॉलिवूडची सेनोरिटा काजोल आणि दिग्दर्शक करण जोहर यांनी नुकतीच कॉमेडी शो, कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी काजोल आणि करण जोहर यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या. यावेळी दोघांनी एकमेकांचे काही सिक्रेटही शेअर केले. या वेळी काजोलला कोणावर क्रश होता याचाही खुलासा झाला आहे.

करण जोहरने याबाबत खुलासा केला आहे. काजोलचे लग्न अजय देवगण सोबत होण्याआधी काजोलला कोणत्या अभिनेत्यावर क्रश होता हे करणने सांगितले आहे. काजोलला अक्षय कुमारवर क्रश होता असा खुलासा करणने केला आहे.

याबाबत बोलताना करण म्हणाला की, “हिना या सिनेमाच्या प्रिमियर पार्टीला अक्षय कुमार आला होता. त्यावेळी मी आणि काजोलदेखील तिथेच होतो. काजोल पूर्णवेळ केवळ अक्षयलाच पहात होती.

तेव्हा मात्र माझी आणि काजोलची मैत्री नव्हती. परंतु तरीही आम्ही दोघांनी मिळून या इव्हेंटमध्ये अक्षयला शोधले होते आणि त्यानंतर आमची चांगली गट्टी जमली.”

काही काळानंतर ये दिल्लगी या सिनेमात अक्षय आणि काजोलने एकत्र काम केला होते. त्यावेळी अक्षय आणि काजोल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. अक्षय आणि काजोल व्यतिरीक्त या सिनेमात सैफ अली खानदेखील मुख्य भूमिकेत होता.

या कार्यक्रमात बोलताना करणने त्याच्याही अनेक गोष्टी शेअर केल्याचे दिसून आले. करण म्हणाला की, “माझे खरे नाव करण नसून राहुल आहे. माझ्या पत्रिकेत माझे नाव राहुल कुमार आहे. परंतु पासपोर्टवर माझे नाव करण असेच आहे.

माझ्या नावाची गंमतच आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण माझे खरे नाव राहुल ठेवण्यात आले होते. परंतु माझ्या जन्माच्या काही दिवसांनंतर माझ्या पालकांना माझे नाव बदलावे असे वाटले. त्यानंतर त्यांनी माझे नाव करण ठेवले. पत्रिकेनुसार माझे नाव बदलण्यात आले होते.

-

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News