भाजी विकणा-या इंजिनियर तरूणीला या अभिनेत्याने दिली नोकरी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

सध्या जॉर्जिया मध्ये अडकलेल्या ५० भारतीय तरूणांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भाजी विकणा-या इंजिनियर तरूणीला या अभिनेत्याने दिली नोकरी 

कोरोनाने भारतात हाहाकार माजला असताना गावाकडं जाणा-या असंख्य मजुरांना गावापर्यंत पोहचवणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद, कोरोनाच्या काळात अनेकांच्या मनात घरं करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद, मध्यंतरी आंध्रप्रदेशात एका गरीब कुटुंबातील मुलगी शेतात नांगर ओढताना पाहिली आणि सोनू सूदनं तिला टॅक्टर भेट दिला. आता तर लॉकडाऊन मध्ये नोकरी गमावलेल्या एका तरूणीला नोकरी दिली आहे. 

कोरोनाच्या काळात अनेकांचं अर्थिकचक्र जागी राहिलं आणि ते जागीचं आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या, तर अनेकांना तुटपुंज्या पगारावरती नोकरी करावी लागत आहे. सोनू सूदच्या एका टविट्र चाहत्याने मदत मागितली होती. त्या टविट्मध्ये त्या असं लिहिलं होतं की, "या मुलीचं नाव शारदा आहे. ही इंजिनिअर असून कोरोनामुळे तिची नोकरी गेली आहे. त्यामुळे तिने खचून न जाता भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. तिला तुमच्या पध्दतीने होईल तशी मदत करा. 

" त्यावर सोनू सुदच्या टविट् वरून उत्तर देण्यात आलं ते असं "माझ्या अधिका-यांनी तिची भेट घेतली आहे. तिच्या नोकरीसाठी मुलाखत घेण्यात आली असून तिला जॉब लेटरही पाठवण्यात आले आहे." कोरोनाच्या काळात रोजगार नागरिकांना घरी पाठवण्यात सोनू सूदने खूप मोठी भूमिका बजावली. सोनू सूदसोबत त्याची टीम सुध्दा मोठ्या प्रमाणात कामात सक्रीय असते. सध्या जॉर्जिया मध्ये अडकलेल्या ५० भारतीय तरूणांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News