अभिनेता चिराग पाटील ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020

आता लवकरच तो ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो त्याचे वडील माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका साकारत आहे. नुकतेच या त्याच्या भूमिकेचे पहिले लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अभिनेता चिराग पाटीलने ‘येक नंबर’ या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचबरोबर ‘चार्जशीट’, ‘वेक अप इंडिया’, ‘वजनदार’ अशा हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये तो झळकला.

आता लवकरच तो ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो त्याचे वडील माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका साकारत आहे. नुकतेच या त्याच्या भूमिकेचे पहिले लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अभिनेता रणवीर सिंहने चिरागचे हे पोस्टर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. या लुक पोस्टरमध्ये चिराग हुबेहूब आपल्या वडिलांप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे चिरागला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News