अभिनेता अरशद वारसीला मिळालं चक्क १२ लाखांचं गिफ्ट !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 January 2020

आता अभिनेता अरशद वारसीला चक्क १२ लाखांचं गिफ्ट मिळालं आहे. तेही त्याचा अगदी जीवलग मित्र जॉन अब्राहमने त्याला दिलं आहे. जॉनने अरशदला १२ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू बाईक दिली आहे. याबाबत अरशद म्हणतो, ‘त्याने आधी माझ्याकडून मला कोणती बाईक हवी आहे हे जाणून घेतलं.

बॉलीवूडमधील कलाकारांची मैत्री, त्यांनी एकमेकांना दिलेले महागडे गिफ्ट्‌स नेहमीच बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. कोणता कलाकार कोणाला काय गिफ्ट देतो हे जाणून घेण्यात इतरांना अधिक रस असतो.

आता अभिनेता अरशद वारसीला चक्क १२ लाखांचं गिफ्ट मिळालं आहे. तेही त्याचा अगदी जीवलग मित्र जॉन अब्राहमने त्याला दिलं आहे. जॉनने अरशदला १२ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू बाईक दिली आहे. याबाबत अरशद म्हणतो, ‘त्याने आधी माझ्याकडून मला कोणती बाईक हवी आहे हे जाणून घेतलं.

मी त्याच्याकडून हे गिफ्ट घेण्यास नकारही दिला, परंतु जॉनने माझ्या घरीच ही बाईक पाठवून दिली.’ जॉनही तितकाच बाईकप्रेमी आहे. त्याने अरशदला दिलेलं हे महागडं गिफ्ट आणि त्यांच्यामध्ये असणारी घट्ट मैत्री सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News