वजनदार ‘शेवंता’

यिनबझ ऑनलाईन टीम
Saturday, 16 February 2019

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळखही आहे. आत हेच बघा ना, शेवंताची या मालिकेत एंट्री झाली आणि काही दिवसांतच शेवंताने प्रेक्षकांना भुरळ घातली.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे खास या मालिकेसाठी अपूर्वा वजनदार झाली आहे. म्हणजेच तिने शेवंतच्या भूमिकेसाठी पाच ते सात किलो वजन वाढवलं आहे. ती म्हणते, ‘प्रत्येक कलाकार आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात असतोच.

मलाही तशी भूमिका मिळाली हे मी माझे भाग्य समजते. शेवंता जरी सुंदर असली तरी कुठेही ती वेगळ्या पद्धतीने दिसली नाही पाहिजे याची मला काळजी घ्यावी लागते.

शेवंता अण्णांना शोभून दिसली पाहिजे यासाठी मला पाच ते सात किलो वजन वाढवावं लागलं आणि त्यासाठी फार मेहनतही घ्यावी लागली.’ एकूणच काय तर सुंदर आणि वजनदार दिसण्यामागे शेवंता म्हणजेच अपूर्वाची फार मेहनत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News