विद्यार्थ्यांच्या निकालावर कोविड-१९ उल्लेख करणा-यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

विद्यार्थ्यांच्या निकालावर कोविड-१९ उल्लेख करणा-यांवर कारवाई 

विद्यार्थ्यांच्या निकालावर कोविड-१९ उल्लेख करणा-यांवर कारवाई 

महाराष्ट्र - मार्चनंतर महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला की, परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. पण जुलै महिना आला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि सरासरी मार्क देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. परंतु कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निकालावर कोविड-१९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची कृषी मंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

कृषी विद्यापीठातल्या परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देऊन निकाल जाहीर केले आहेत. परंतु त्या निकालावर कोविड-१९ असा उल्लेख केल्याने कृषी मंत्री दादा भुसे प्रचंड संतापले आहेत. निकाला संदर्भात राज्य शासनाचा कसलाही आदेश नसताना कोविड-१९ चा उल्लेख करणे चुकीचे असल्याचे सुध्दा कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात कोविड-१९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निकालावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे असा उल्लेख करण्याचा आदेश देणा-या व्यक्तीची चौकशी करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा असं पत्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून पाठवण्यात आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News