टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 1 लाख 11 हजार नागरिकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे. राज्यात एक लाख 11 हजार 412 गुन्हे नोंदवून पोलिसांनी 22 हजार 492 व्यक्तींना अटक केली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांत चार कोटी 56 लाख 51 हजार 104 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जारी झालेल्या लॉकडाऊनच्या उल्लंघनाचे राज्यात एक लाख 11 हजार गुन्हे दाखल झाले. या प्रकरणांत पोलिसांनी 22 हजार 492 जणांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवरील हल्ल्याच्या 244 प्रकरणांत 823 जणांना ताब्यात घेतले आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे. राज्यात एक लाख 11 हजार 412 गुन्हे नोंदवून पोलिसांनी 22 हजार 492 व्यक्तींना अटक केली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांत चार कोटी 56 लाख 51 हजार 104 रुपये दंड आकारण्यात आला आहे. हातावर विलगीकरणाचा शिक्का असलेल्या 680 जणांना शोधून विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. राज्यात एकूण चार लाख सात हजार 342 व्यक्ती विलगीकरणात आहेत.

अत्यावश्‍यक सेवेसाठी आतापर्यंत पोलिसांनी चार लाख 12 हजार 359 पास दिले आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1317 वाहनांवर गुन्हे दाखल करून 67 हजार 972 वाहने जप्त केली असे पोलिसांनी सांगितले. परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कोरोनाविरोधी लढाईत कर्तव्य बजावताना राज्यातील 14 पोलिसांना जीव गमवावा लागला. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले 142 पोलिस अधिकारी आणि 1246 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या पोलिसांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3717 रिलिफ कॅम्पमध्ये तीन लाख 54 हजार 195 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळातील गुन्हे

 • 1. एकूण गुन्हे- एक लाख 11 हजार 412
 • अटक झालेले नागरिक- 22 हजार 492
 • दंडवसुली- 56 लाख 51 हजार 104 रुपये
 • 2. पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना- 244
 • अटक- 823
 • 3. विलगीकरण केलेल्या व्यक्ती- चार लाख सात हजार 342
 • विलगीकरण अर्थात हातावरील शिक्का मारलेल्या 680 नागरिकांचा शोध
 • 4. प्रवासासाठी दिलेले पास- चार लाख 12 हजार 359 पास
 • 5. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे- 1317
 • वाहने जप्त- 67 हजार 972
 • 6. व्हिसा उल्लंघन- 15 गुन्हे
 • 7. कोरोनामुळे जीव गमावलेले पोलिस- 14
 • कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले पोलिस अधिकारी- 142
 • कर्मचाऱ्यांवर उपचार- 1246
 • 8. रिलिफ कॅम्प- 3717
 • नागरिकांची व्यवस्था- तीन लाख 54 हजार 195

100 क्रमांकावर दूरध्वनींचा मारा

सर्व जिल्ह्यांत 24 तास सुरू असलेल्या पोलिस विभागाच्या 100 क्रमांकावर लॉकडाऊनच्या काळात तब्बल 95 हजार 291 दूरध्वनी आले आहेत. या दूरध्वनींची योग्य दखल घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News