अचला किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत.
  • त्यापैकी दगड पिंप्रि गावामागे असलेला अचला गड हा छोटेखानी किल्ला अहिवंत गडाचा साथीदार आहे.

नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी दगड पिंप्रि गावामागे असलेला अचला गड हा छोटेखानी किल्ला अहिवंत गडाचा साथीदार आहे. अचला गडाचे स्वरूप पाहाता हा टेहळणीचा किल्ला असावा. या किल्ल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराला टवल्या नावाने डोंगराला भैरवाचा डोंगर म्हणतात.

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसांत व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला, अहीवंत पाहून दरेगावातील मारूती मंदिरात किंवा मोहनदर किल्ला पाहाता येईल.

दगड पिंप्री हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावात ५ फूट उंचीच्या ५ वीरगळी पाहायला मिळतात. गड चढायला सुरूवात केल्यावर अचला गडाची सोंड खाली उतरते. त्या खिंडीत एक पत्र्याचे देऊळ आहे. त्या देळाला सतीचे देऊळ म्हणतात. तेथून एक टप्पा चढून गेल्यावर भगव्या झेंड्याच्या खाली शेंदुर फासलेली हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. गडाच्या कातळ टोपी खाली गडावर जाणाऱ्या कातळ कोरीव पायऱ्या पाहायला मिळतात.

अर्ध्या पायऱ्या चढल्यावर कातळात वरच्या बाजूला एक ३ फूट लांब आणि ३ फूट रूंद आकाराची चौरस प्रवेशव्दार असलेली गुहा पाहायला मिळते. गुहेत जाण्यासाठी पायऱ्या सोडून थोड चढून जाव लागत. गुहा १० फूट लांब आहे. या गुहेतून दूरवरचा परीसर चांगला दिसतो. यांची योजना टेहळणीसाठी केलेली असावी. गुहा पाहून परत पायऱ्या चढायला सुरूवात करावी. पायऱ्या संपतात तेथे पाण्याचे बुजलेले एक टाक आहे. पुढे एक छोटा टप्पा चढुन गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे बुजलेले एक टाक आहे.

गड माथ्यावर प्रवेश केल्यावर एक टाक दिसत. त्या टाक्या भोवतीच्या झुडूपांवर कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे घालून जातात. आज मात्र हे टाक सुकलेल आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला एका झाडाखाली काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. पण त्या ओळखता येण्याच्या पलिकडे झिजलेल्या आहेत.

त्यामागे घरांची जोती आहेत. तिथून उजव्या बाजूला वळून किल्ला आणि बाजूचा डोंगराच्या घळीत उतरायला सुरूवात केली की, दोन टाकी आहेत. त्याच्या खाली एका पुढे एक पाच टाकी आहेत. अशी ८ टाक्यांची अनोखी रचना पाहायला मिळते. ही टाकी पाहून परत किल्ल्यात प्रवेश केला तेथे येऊन विरूध्द दिशेला (प्रवेश केला तेथून डावीकडे) डाव्या बाजूला गेल्यावर एक मोठा पाण्याच कोरड टाक पाहायला मिळते.

त्यात दगड पडून ते बऱ्याच प्रमाणात बुजलेल आहे. टाक पाहून परत प्रवेशव्दाराशी आल्यावर गडफेरी पूर्ण होते. गडमाथा छोटा असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो. अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या. रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग अचला वरून पाहायला मिळते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News