संशोधनानुसार वेगानं चालणाऱ्यांचं आयुष्य अधिक असतं
नॅशनल इन्स्टिट्यूड फॉर हेल्थ रिसर्चच्या संशोधनानुसार वेगानं चालणाऱ्यांचं आयुष्य हे अधिक असल्याचं समोर आलं आहे. उत्तम आरोग्यासाठी चालणं हे महत्त्वाचं असतं. चालल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो, स्थूलपणा कमी होतो, माणूस जास्त अॅक्टीव्ह होतो हे आपण ऐकले असेलच त्यामुळे नियमित चालणं हे आरोग्यास फायदेशीर ठरतं. मात्र हळू चालावं की वेगानं असा प्रश्न अनेकांना असतो.

या रिसर्चनुसार, जे लोक वेगाने चालतात त्यांचं सरासरी आयुष्य हे अधिक असतं. ४ लाख ७४ हजारांहून अधिक लोकांवर केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.मग त्यांचं वजन सामान्यपेक्षा कमी असो वा ते स्थूलपणाचे शिकार असतो यामुळे फरक पडत नाही. तर ज्या लोकांचं वजन सामान्यापेक्षा कमी असतं आणि ते हळुवार चालतात त्यांचं सरासरी आयुष्य हे सर्वात कमी असतं असे पुरूष सरासरी ६४.८ वर्ष जगतात तर महिला ७२.४ वर्ष जगतात असं या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
'लोकांनी त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं. एखाद्या व्यक्तीचा जीवनकाळ हा किती जास्त असेल हे त्याच्या शरीराच्या वजनापेक्षाही जास्त त्याच्या फिजिकल फिटनेसवर अवलंबून असतं म्हणूनच नियमीत व्यायाम करण्याला लोकांनी प्राधान्य दावं असा आमचा प्रयत्न असणार असल्याचं' रिसर्चचे मुख्य लेखक प्राध्यापक टॉम येट्स म्हणाले.