छेडछाडी पासून वाचण्याचा प्रयत्न करताना अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या उत्तरप्रदेशातील तरुणीचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेला काळिंबा फासणारी घटना आज घडली आहे. उत्तरप्रदेश राज्यातील बुलंद शहरात छेडछाड करणाऱ्या टवाळ खोरांपासून स्वतःचा बचाव करताना सुदीक्षा भाटी या तरुण विद्यार्थिनीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

लखनौ :- उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेला काळिंबा फासणारी घटना आज घडली आहे. उत्तरप्रदेश राज्यातील बुलंद शहरात छेडछाड करणाऱ्या टवाळ खोरांपासून स्वतःचा बचाव करताना सुदीक्षा भाटी या तरुण विद्यार्थिनीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुदीक्षा भाटी ही तरुणी अमेरिकेतील बॅब्सन कॉलेजात उच्च शिक्षण घेत होती. भारतात लॉकडाऊन सुरु असताना वंदे भारत मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या  विमानांद्वारे ती भारतात तिच्या घरी परतली होती आणि येत्या २० ऑगस्टला ती पुन्हा अमेरिकेत जाणार होती. परंतु त्याआधीच तिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 

अपघाताच्या दिवशी सुदीक्षा ही तिच्या काकांसोबत स्कुटरवरून औरंगाबाद येथे तिच्या मामांकडे जाण्यास निघाली होती. रस्त्यात छेडछाड करणाऱ्या टोळीतील मुलांनी बुलेटवर येऊन तिच्यावर घाणेरड्या भाषेत कंमेंट करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सुदीक्षा व तिच्या काकांनी त्यांना विरोध केला परंतु बुलेट चालवत असलेल्या मुलाने सुदीक्षाच्या गाडीला जोरात टक्कर दिली. सुदीक्षा व तिचे काका स्कुटीला जोरदार टक्कर बसल्यामुळे जमिनीवर कोसळले. याअपघातात गंभीर जखमी झालेल्या सुदीक्षाचा जागीच मृत्यू झाला. 

सुदीक्षा भाटी ही गौतम बुद्ध नगरच्या दादरीमध्ये राहणारी अतिशय हुशार मुलगी होती.  सुदीक्षाचे वडील हे उत्तरप्रदेशात एक ढाबा चालवतात. घरची परिस्तिथी गरिबीची असताना देखील सुदीक्षा आपले शिक्षण पूर्ण करीत होती. तिचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदच्या शाळेत झाले. बारावी परीक्षेमध्ये ती बुलंदशहरामध्ये पहिली आली होती. त्यानंतर तिची निवड पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील कॉलेजात झाली. मागील वर्षीच HCL कडून सुदीक्षाने मेहेनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ३.८० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून ती अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली होती. या घटनेनंतर उत्तरप्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना गाझियाबाद येथे झाली होती. आपल्या भाची सोबत गैरवर्तन करणाऱ्यास जाब विचारल्यामुळे एका पत्रकाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. सुदीक्षा भाटी प्रकरणात पोलिसांनी दोन अज्ञात दुचाकीस्वारांन विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News