परफ्युम वापरायची सवय असेल तर पावसाळ्यात 'या' गोष्टींकडे लक्ष द्या!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 30 August 2019

तुम्हाला घरातून बाहेर पडताना परफ्युम वापरायची सवय असेल तर पावसाळ्यात काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण सगळ्या ऋतूंमध्ये तुम्ही एकाचप्रकारचे परफ्यूम वापरू शकत नाही. नेमके कोणते परफ्यूम पावसाळ्यात वापरणं चांगलं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

ओरिएण्टल परफ्यूम- तुम्हाला जर फिकट सुगंध आवडत असेल तसेच पार्टनसरसोबत पार्टी किंवा डिनरला जात असाल तर परफ्यूमचा हा प्रकार तुम्ही नक्की वापरू शकता. या परफ्यूममुळे पार्टनर तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल.

सिट्रस परफ्यूम- जर तुम्हाला फिकट सुंगध आवडतो तर तुम्ही एकदा या प्रकरचा परफ्यूम वापरा. संत्र, लिंबू अशा वेगवेगळ्या प्रकारात हा परफ्यूम बाजारात उपलब्ध आहे.

फ्लोरल परफ्यूम- नावाप्रमाणेच हा परफ्यूम फुलांपासून तयार केला जातो. यात गुलाब, लिली, जास्मीनसारखी फूलं असतात. हा परफ्यूम लावल्याने फूलांचा सुगंध आसपास पसरतो.

वुडी परफ्यूम- सौम्य सुगंधापासून गडद सुगंधापर्यंतचे प्रकार या परफ्यूममध्ये उपलब्ध असतात. यात चंदन, देवदार आणि अनेक मसाल्यांचा वापर केलेला असतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News