माझ्या आई विषयी थोडंसं...

विकास जाधव, परभणी
Sunday, 12 May 2019

आईसाठी लेकरु म्हणजे काळजाचा तुकडा असतो... ती बिनशर्त, निःस्वार्थ, अविरतपणे आपल्या लेकराची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत असते.. लेकरांच्या दुःखाच्या वेदना तिच्या ह्रदयावर काही न बोलता, न सांगता घाव घालत असतात.. 

वैक्तिक माझ्या आईविषयी बोलायचं झालं तर तिनं आम्हां चौघां बहीण-भावंडांना सकाळी शाळेत जाताना कधीही शिळा डबा दिलेला आठवत नाही. 

पहाटे चारला उठून ती आमच्यासाठी राबत असे, तेव्हा कधी शाळेला आम्ही 100 टक्के हजेरी लावत असू.. कठीण प्रसंगात कुटुंब कसं सावरायचं हेही तिलाच जमतं.. दुःख पचविण्याची क्षमता कुणात असते तर तीही तिच्यातच.. आज आम्ही जिथं कुठं आहोत ते केवळ तिच्याच मेहनतीमुळे, आजही ती तितक्याच मेहनतीने आम्हां सर्वांसाठी राबते, काळजी घेते. 

माझ्यासारख्या नेहमी प्रवासात असणाऱ्या किंवा महत्वाकांक्षी लेकराला ती पूर्ण मोकळीक देते.. आत्मविश्वास देण्याचं अन हव्या त्या क्षेत्रात करिअर करण्याची मुभाआईबाबांनी तसी पहिल्यापासूनच दिलेली.. त्यामुळे मिळालेला दबाव पण संधी म्हणून पाहण्याचं कसब शिकता आलं. या माझ्या आईसाठी अख्ख आयुष्य वेचलं तरी कमीच पडेल, तिच्यासाठी आपण नेहमी कृतज्ञ असू तिच्या सेवेची संधी म्हणजेच खरी भक्ती होय. 

तिच्या चरणी मस्तक ठेवलं तर सारे दुःख हलके होत जातात. आपण कितीही झोकून, समर्पित भावनेने सेवा केली तरी तिचे कष्ट फिटणार नाहीत. म्हणूनच म्हणतात " न ऋण जन्मदातेचे फिटे"  

आईची सेवा करा तिला सदोदित प्रेम द्या ..!! 
तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारा प्रत्येक दिवस याच भावनेतून आईच्या प्रेमासाठी समर्पित कराल हीच एक माफक अपेक्षा ..!! 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News