केंद्र सरकारच्या विविध खात्यांमंध्ये तब्बल 7 लाख पदांची होणार भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 November 2019

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधून जवळपास 7 लाख पदे रिक्त
एसएससी बोर्डाकडून 1 लाख पदांची भरती प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधून जवळपास 7 लाख पदे 1 मार्च 2018 पर्यंत रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 6 लाख 83 हजार 823 पदांपैकी 5,74,289 पदे ही क श्रेणीतील, 89,638 पदे ही ब श्रेणीतील आणि 19,896 पदे ही अ श्रेणीतील आहेत.

एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना मनुष्यबळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. विविध खात्यांकडून मिळालेल्या रिक्त पदांच्या माहितीनंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनने (एसएससी) चालू आर्थिक वर्षात 1 लाख 5 हजार 338 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

2017-18 मध्ये क श्रेणीतील आणि लेव्हल-1 पदांमधील 1,27,573 रिक्त पदांची माहिती रेल्वे मंत्रालयाने आणि रेल्वे भरती बोर्डाने दिली होती. यात नव्या आणि पुढील दोन वर्षांत निर्माण होऊ शकणाऱ्या पदांचा समावेश होता असेही सिंग यांनी सांगितले.

पोस्ट खात्याने 19,522 पदांसाठी चाचणी परीक्षा घेतली असून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात एसएससीकडून भरती केल्या जाणाऱ्या पदांव्यतिरिक्त पदांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी संगणकावर आधारित चाचणी परीक्षा घेतली जाते आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News