'तरूणांना' मोठे करण्याचे सामर्थ्य "शिक्षणात"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

समाजाने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण समाजासाठी कोणते योगदान देतो हे महत्त्वाचे आहे. समाजाप्रति आपले दायित्व आहे याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

काणकोण : समाजाला मोठे करण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे. त्यासाठी समाजाच्या युवा-युवतीनी शिक्षणाची कास धरायला हवी, असे मत कोमरपंत समाजाच्या मुंबई शाखेच्या पदाधिकारी स्मिता प्रेमानंद नाईक यांनी अखिल गोवा क्षत्रिय कोमरपंत समाजाच्या काणकोण येथील मेळाव्यात व्यक्त केले. श्रीस्थळ येथील जी. एम. सेलिब्रेशन सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.गेल्या पावसाळ्यात कारवार जिल्ह्यातील अनेक घरे पुराच्या पाण्याखाली जाऊन अतोनात नुकसानी झाली, त्यावेळी समाजाच्या अनेक घटकानी आपदग्रस्ताना मदतीचा हात दिला.

समाजाने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण समाजासाठी कोणते योगदान देतो हे महत्त्वाचे आहे. समाजाप्रति आपले दायित्व आहे याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. निवडणुकीवेळी राजकारणी आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजामध्ये कधीच भरून न येणारी फूट घालत असतात त्यासाठी प्रत्येकाने जागृत राहण्याची गरज नाईक यांनी व्यक्त केली.कारवार नगरपालिकेचे नगरसेवक नंदा नाईक, समाजाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण नाईक, सचिव अरुण नाईक, मेळाव्याचे संयोजक सूरज कोमरपंत,संघटनेच्या महिला विभाग प्रमुख संजना नाईक, युवा विभाग प्रमुख मोहित नाईक  उपस्थित होते.समाजाचे सभागृह संकुल असण्याची गरज आहे. त्यासाठी शारदंबा चेरिटेबल ट्रस्ट पुढाकार घेणार आहे.

सध्या सुयोग्य जागेचा शोध घेण्यात येत आहे. समाजाच्या सदस्यांनी सभागृह उभारणीसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन ट्रस्टचे रमेश बाबय कोमरपंत यांनी यावेळी केले.यावेळी समाजाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण नाईक यांनी समाजाच्या काणकोण मधील १५ व्या मेळाव्याचे अविस्मरणीय असे आयोजन केल्याबद्दल समाज कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. दहावी ते पदव्युत्तर परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या गुणवंताचा पाहुण्याच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यामध्ये आस्था कोमरपंत, नाईक नाईक, आर्या नाईक, श्रद्धा संजय कोमरपंत,अनुराग नाईक, अर्पिता नाईक, श्रेया नाईक, अंकित नाईक, दिव्या नाईक, सोनाली कोमरपंत, अदिती नाईक, आदित्य कोमरपंत, श्रुती नाईक, नेहाल कोमरपंत, मिथील नाईक, प्राप्ती नाईक, रजत म्हाळशेकर, स्मिता कोमरपंत, रेश्मी कोमरपंत याना बक्षिसे व शिष्यवत्ती प्रदान करण्यात आल्या.

समाजातील डॉक्टरेट प्राप्त केलेले त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये डॉ. शंकर कोमरपंत, डॉ. लक्षिता लक्ष्मण कोमरपंत, डॉ. संगीता नाईक, डॉ. प्रतिक्ष नाईक तसेच शांताराम नाईक, रसिका दुकळो कोमरपंत, विठोबा कोमरपंत, बाबुसो कोमरपंत,शशिकांत कोमरपंत, प्रविण प्रकाश नाईक याचा गौरव करण्यात आला.मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सत्यनारायण महापूजेची यजमानकी संजय कोमरपंत यांनी सपत्नीक केली. कला व संस्कृती खात्याच्या सहकार्याने. वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.

विजेत्या स्पर्धकांना एच. एल. नाईक, आत्माराम नाईक, सुरेश कोमरपंत, अंता कोमरपंत, राजाराम नाईक यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष गोपाळकृष्ण नाईक यांनी स्वागत केले. सूरज कोमरपंत यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे सचिव अरूण नाईक यांनी संघटनेच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन कविन कोमरपंत, सोनाली नाईक, अक्षय नाईक यांनी केले. दत्ता कोमरपंत यानी आभार मानले. मेळाव्यात समाजाने प्रतिबिंब या स्मरणिकेचे प्रकाशन केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News