अबब..! एवढा मोठा बटाटा पाहिलात का? खायचा नाही, रहायचा

स्वप्निल भालेराव (यिनबझ)
Tuesday, 30 April 2019

बटाट्या पासुन आपण अनेक पदार्थ बनविलेले पाहिले असाल. आता चक्क बटाट्या पासुन आलिशान हॉटेल बनवल आहे. ऐकाव ते नवलचं. 

'बटाटा' एक फळभाजी, तीचे अनेक पदार्थ बनवुन आपण खात असतो. 'बटाटा' जीभीचे चोचले पुरवत असतो. असा लोकप्रिय बटाटा जगभर प्रसिद्ध आहे. बटाट्या पासुन आपण अनेक पदार्थ बनविलेले पाहिले असाल. आता चक्क बटाट्या पासुन आलिशान हॉटेल बनवल आहे. ऐकाव ते नवलचं. 

अमेरिकेतील इदाहोम येथे एक मोठा बटाटा बनवण्यात आला. त्याचे नाव 'बिग इदाह पोटॅटो हॉटेल' तुम्हीही या हॉटेलात राहू शकता. एक रात्र राहण्यासाठी 200 डॉलर म्हणजे 14 हजार रुपये खर्च येतो. हे हॉटेल 6 टनाच आहे. स्टीस, प्लास्टर आणि कॉक्रिटपासून हॉटेल बनवण्यात आलं आणि एका शेतात नेऊन ठेवल. हॉटेल भोवताली गवत लावल. जनु शेतात एक भव्य बटाटाच उगवला, पाहताक्षणी असा अनुभव होतो.    

या हॉटेल मध्ये दोन व्यक्ती आरामात राहू शकतील. यात एक बाथरुम, किचन, थंडीपासुन संरक्षण मिळावे यासाठी आग पेटवण्याची जागा, एअर कंडीशनची सोय करण्यात आली आहे. हे हॉटेल सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. एक रात्र राहण्यासाठी 200 डॉलर, 21 डॉलर सर्व्हिस टॅक्स, 16 डॉलर आॅक्युपेंसी टॅक्स भरावा लागतो. याचा एकुण खर्च 237 डॉलर होतो.  म्हणजे 18000 हजार रुपये द्यावे लागतील. अमेरितीला गेल्यानंतर नक्की एकदा पहाच हा 'बिग इदाह पोटॅटो हॉटेल' मग जाणार ना? 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News